कामगारांचे जीवन प्रकाशमान व्हावे

पोलीस अधिकारी विश्‍वास नांगरे पाटील

मुंबई | प्रतिनिधी |
कष्टकरी कामगार यांच्या  जीवनातील अंधार दूर झाला पाहिजे, असे स्पष्ट उदगार मुंबईचे  पोलीस सह आयुक्त श्री. विश्‍वास नांगरे पाटील यांनी काढले. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे मुखपत्र  पोर्ट ट्रस्ट कामगार  या रौप्यमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन  मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मुंबईचे  पोलीस सह आयुक्त  विश्‍वास नांगरे पाटील   यांच्या हस्ते झाले.  ज्यांना स्वप्न पहायची असतात, त्यांना रात्र मोठी हवी असते, ज्यांना स्वप्न साकार करायची असतात, त्यांना दिवस मोठा हवा असतो. जे गेलं ते सोडून द्या, जे आहे त्याचा स्विकार करा आणि जे घडवायचे आहे, त्यावर प्रामाणिकपणे विश्‍वास ठेवा,असे ते म्हणाले.
यावेळी  ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. एस. के. शेट्ये, मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्‍वस्त सुधाकर अपराज ,सेक्रेटरी यु. आर. मोहनराजू ,नुसीचे जनरल सेक्रेटरी  अब्दुल गणी सेरंग  आदींची भाषणे झाली.   प्रास्ताविक  कार्यकारी संपादक मारुती विश्‍वासराव यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख सहसंपादक विजय रणदिवे यांनी करून दिली.  कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन विद्याधर राणे यांनी केले, तर आभार सहसंपादक दत्ता खेसे यांनी मानले.  कार्यक्रमाच्या सुरवातीला असिस्टंट शेड सुप्रीटेंडन्ट संतोष सकपाळ यांनी गणेश वंदना व सरस्वती वंदनाने केली. पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रकाशन सोहळ्यास मिलिंद कांदळगावकर, सुनील नायर, सुरेश सोळंकी, सलीम झगडे,  विकास नलावडे, अहमद काझी, निसार युनूस, संदीप कदम, शशिकांत बनसोडे, शीला भगत, मनीष पाटील, संदीप चेरफळे, बाळकृष्ण लोहोटे, पुंडलिक तारी,  मिलिंद घनगुटकर, नंदू राणे, विजय सोमा सावंत,   प्रकाश दाते आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version