पेशवाई रोडचे रूप बदलले

नेरळ प्राधिकरण कंदील निधीमधून काँक्रिटीकरण
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ ममदापुर संकुल विकास प्राधिकरण मधील पेशवाई रोडचे रूप प्राधिकरणकडून करण्यात आलेल्या काँक्रिटीकरण कामांमुळे बदडले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामासाठी निधी मंजूर केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भगवान चंचे यांनी या रस्त्याच्या कामासाठी सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता आणि त्यामुळे तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी रस्त्यासाठी प्राधिकरणाने मंजूर केला होता. कल्याण-कर्जत रस्त्याने नेरळ गावात न येता दामत रेल्वे फाटकातून कोल्हारे साई मंदिर येथे येण्यासाठी पेशवाई रोड हा रस्ता वापरला जात आहे. मात्र या रस्त्याची अवस्था दयनीय असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या पर्यायी मार्गाचा वापर फार कमी प्रमाणात केला जात होता. त्यावेळी नेरळ गावचे माजी सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भगवान चंचे यांनी पेशवाई रस्त्याचे मजबुतीकरण व्हावे अशी मागणी सुरेश लाड आणि रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याकडे केली होती. वाहनचालकांचे खराब रस्त्यामुळे होणारे हाल आणि रस्त्याची गरज लक्षात घेऊन नेरळ ममदापुर संकुल विकास प्राधिकरण मधून नेरळ,ममदापुर आणि कोल्हारे ग्रामपंचायत मधील रस्त्यांची कामे करण्यासाठी निधी देण्याचा निर्णय रायगड जिल्हा परिषदेमधील शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनी घेतला होता. त्यानुसार नेरळ मधील पिशवी रस्त्याच्या कामासाठी नेरळ विकास प्राधिकरणमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निधीचे वाटप वेगवेगळ्या कामांसाठी करून घेतले होते.

Exit mobile version