। पाताळगंगा । वार्ताहर ।
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे प्रत्येक नागरिकांची अंगाची लाही-लाही होत आहे. या उन्हाच्या चटक्या पासून थकवा कमी व्हावे, यासाठी निसर्गाने या ऋतूमध्ये रसाळ फळे व रानमेव्याची निर्मिती केली असेल. त्यामुळे बाजारात पेठेच्या ठिकाणी जंगलातील रानमेवा दाखल झाले असून हा खरेदी करण्याचा नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. उन्हाळ्याचे आगमन होताच हा रानातील रानमेवा बाजारात आल्याने यामध्ये करवंदे, कैरी, अंजीर, काजू, चिंच आदी जंगलामध्ये तयार झालेला रानमेवा मोहपाडा, खोपोली, चौक या बाजारात दाखल झाला आहे. या रानमेव्यामुळे आदिवासी समालाला रोजगार मिळत असतो.
रुचकर, स्वस्त आणि औषधी असे बहुउपयोगी असलेल्या या रानमेव्याची अनेकांनी भुरळ पडत आहे. दुर्गम भागात राहणारे अदिवासीं बांधवांचे उत्पन्नाचे साधन म्हणून डोंगरातील रानमेवा असून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पटकन तोंडात टाकता येणारा तसेच शरीराला आणि मनाला गारवा देणार्या या रानमेव्याला अधिक मागणी दिसत आहे. असह्य करणार्या उन्हामध्ये अगदी पटकन तोंडात टाकता येणार्या आणि खायला रुचकर असणार्या या रानमेव्यांना लहान मुलांपासून मोठ्या मंडळींचीही मागणी असते. शरीराला थंडावा देणारा आणि औषधी गुणधर्म असणारा रानमेवा अगदी आवडीने खाताना दिसतात.
रणरणत्या उन्हात रानमेव्याची भुरळ
