| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम हे शेतकरी कामगार पक्ष तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी केले आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी उरण पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल, असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका चिटणीस रवी घरत यांनी व्यक्त केला आहे.
उरण हा शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांचा तालुका आहे. या तालुक्यातील जनतेच्या, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने शेकाप रस्त्यावर उतरला आहे. येथील गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी काम केले आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी उरण तालुक्यातील जासई, चिरनेर, नवघर आणि चाणजे या चार जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार हे जनता जनार्दनाच्या आशिर्वादाने विजयी होतील. तसेच, उरण तालुक्यातील जासई, विंधणे, चिरनेर, आवरे, नवघर, भेंडखळ, चाणजे, केगाव या आठ पंचायत समितीच्या गणातून महाविकास आघाडीतील शेकाप, काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार विजयी होऊन पुन्हा एकदा उरण पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल, असा विश्वास शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत यांनी व्यक्त केला आहे.






