मार्शल लढतीआधी सांगतो विजयी संघाचे नाव

| मुंबई | वृत्तसंस्था।

आयपीएलच्या 17व्या हंगामाला 22 मार्च रोजी सुरूवात झाली. रविवारपर्यंत स्पर्धेत पाच लढती झाल्या. हंगामातील पहिली लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाली होती. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी डबल हेडरच्या लढती झाल्या.

आयपीएल 2024मधील पाच पैकी पहिली चेन्नई आणि रविवारी झालेली राजस्थान विरुद्ध लखनौ या दोन लढती वगळता प्रत्येक मॅच अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झाल्याचे दिसले. आयपीएलच्या सुरुवातीलाच लढती चुरशीच्या होताना दिसत आहेत. प्रत्येक मॅचच्या आधी चाहते कोणाचा विजय होणार या बद्दल चर्चा करत असतात. फक्त चाहतेच नाही तर माजी खेळाडू देखील त्यांचे फेव्हरेट संघ सांगत असतात.

आयपीएलच्या प्रत्येक लढतीआधी जर तुम्हाला त्याचा निकाल कळाला तर? ऐकताना आणि वाचताना थोडे अजब वाटत असेल.पण प्रत्यक्षात असे होत आहे. असे एक ठिकाण आहे जेथे प्रत्येक मॅचच्या आधी त्यामध्ये कोणाचा विजय होणार हे सांगितले जाते. विशेष म्हणजे मॅचच्या आधी सांगितला जाणारा अंदाज 90 टक्क्यांहून अधिक वेळा बरोबर आले आहेत. आता इतक सर्व वाचल्यानंतर तुम्हाला देखील उत्सुकता निर्माण झाली असेल की हे सर्व नेमक जाहीर तरी कुठे होते.
इंस्टाग्रामवर नावाचे एक पेज आहे. या पेजवर आयपीएलच्या प्रत्येक सामन्यातील विजयी संघाची भविष्यवाणी केली जाते. बर ही भविष्यवाणी कोणा एका क्रिकेट तज्ञाकडून किंवा ज्योतषी किंवा न्यूमरोलॉजीस्टकडून केली जात नाही तर मार्शल नावाच्या एका श्‍वानाकडून केली जाते.

मार्शलसमोर दोन चेंडू ठेवले जातात. ज्याच्या कॅमेर्‍याच्या बाजूला त्या दिवशी होणार्‍या संघांची नावे असलेली पट्टी असते. ही पट्टी मार्शलला दिसत नाही. तो येतो आणि एक चेंडू उचलून घेऊन जातो. जो चेंडू सोडून जातो त्या संघाचा पराभव होण्याची शक्यता, असे व्हिडिओ शूट करणार्‍यांचा दावा आहे. मार्शलने आतापर्यंत पाच सामन्याचे भविष्य सांगितले. ज्यापैकी 4 मध्ये तो अचूक ठरला. तर एका सामन्याचा त्याने वर्तवलेला अंदाज चुकीचा निघाला.

Exit mobile version