सुरक्षा रक्षकाचा मोबाईल चोरीला

। पनवेल । वार्ताहर ।

डिलेव्हरी बॉय बनून आलेल्या एका चोरट्याने खारघर वसाहतीमधील इमारतीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाचा मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडली आहे. खारघर वसाहतीमधील सेक्टर 35 येथील कृष्णा मॅजेस्टी सोसायटीच्या लिफ्टसमोर सुरक्षा रक्षक बसला होता. दरम्यान, सुरक्षा रक्षक बाजूला कामासाठी गेला असताना तेथे आलेल्या डिलेव्हरी बॉयने सुरक्षा रक्षकाच्या टेबलावर ठेवलेला मोबाईल फोन चोरुन नेला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रित झाली आहे. याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version