| पनवेल | प्रतिनिधी |
कर्नाळा खिंडीत एका अवजड वाहनाने मंकी जाळीला धडक दिल्याने दोन्ही बाजूंचे लोखंडी पोल वाकून जाळी रस्त्यावर आली. या घटनेमुळे दोन्ही दिशेची वाहतूक विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेनंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांचे पथक तसेच पळस्पे वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून रस्त्यावर आलेली मंकी जाळी बाजूला करण्याचे काम हाती घेतले. त्यानंतर वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.
कर्नाळा खिंडीत मंकी जाळी रस्त्यावर
