मोरबे धरणाने काठ गाठला

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

खारघर, कामोठेसह नवी मुंबईकरांची तहान भागविणार्‍या मोरबे धरण क्षेत्रात मागील दोन महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावाली होती. यामुळे मोरबे धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. तसेच, धरणाने काठ गाठल्याने पालिकेने गुरुवार दि.29 ऑगस्ट रोजी विधीवत जलपूजन करुन पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

यावेळी आ. गणेश नाईक, पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्या हस्ते आणि माजी महापौर सुधाकर सोनावणे व जयवंत सुतार, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि माजी लोकप्रतिनिधी, पालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत जलपूजन संपन्न करण्यात आले. यानंतर आ. गणेश नाईक यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलची कळ दाबून धरणाचे दरवाजे 10 सेमीने उघडण्यात आले. यानंतर पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

Exit mobile version