इतिहासातील सर्वात रोमांचक शर्यत

। पॅरिस । वृत्तसंस्था ।

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीतील सर्वात रोमांचक शर्यतींपैकी एकामध्ये सुवर्णपदक जिंकून नोहा लायल्स हा जगातील सर्वात वेगवान पुरुष बनला आहे. श्‍वास रोखून धरणार्‍या या 10 सेकंदांमध्ये जगातील अव्वल खेळाडूंमध्ये अशी स्पर्धा रंगली होती की, हा फरक एका सेकंदाच्या छोट्या पॉईंटवर ओळखता आला नाही. अमेरिकन धावपटू लायल्सने 9.784 सेकंदांच्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळेसह शर्यत पूर्ण केली. परंतु, असे करणारा तो एकमेव धावपटू नव्हता. जमैकाचा धावपटू किशन थॉम्पसन यानेही त्याच वेळेत शर्यत पूर्ण केली. या दोन धावपटूंमध्ये फक्त 0.005 सेकंदांचा फरक होता, ज्यामुळे हा सामना ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात भारी ठरला. तर, अमेरिकेचा धावपटू फ्रेड कर्लीने 9.81 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले.

Exit mobile version