गीतेंच्या विजयात मुस्लीम समाजाचा मोठा वाटा: आ. जयंत पाटील

| नागोठणे | वार्ताहर |

लोकसभेची ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे. कुणीही पैसे मागत नाही व कसलीही अपेक्षा करीत नाही. या निवडणुकीत देशातील, जिल्ह्यातील वातावरण बदललेले आहे. मोदींना हटविण्याचे काम या देशातील 13 टक्के मुस्लीम जनता करीत आहे. ही निवडणूक आपण वेगळ्या प्रकारे लढवायची असून, जिंकायची आहे. त्यामुळे या निवडणुकीत अनंत गीतेंना प्रचंड मताधिक्य देऊन दिल्लीला पाठवायचे असून, त्यामध्ये मुस्लीम समाजाचा मोठा वाटा असेल, असे ठोस प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी नागोठण्यात केले.

इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ येथील हुजरा मोहल्ल्यात शनिवारी (दि.4) रात्री संपन्न झालेल्या सभेत ते बोलत होते. या सभेला आ. जयंत पाटील यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील, सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, काँग्रेसचे रायगड लोकसभा समन्वयक राजा ठाकूर, स्टार प्रचारक शेख सुभान आली, शिवसेना जिल्हा प्रवक्त्या मनिषा ठाकूर, सुवर्णा वाळूंज, शेकापचे शंकरराव म्हसकर, महादेव मोहिते, शिवसेना नागोठणे विभाग प्रमुख संजय भोसले, उपविभागप्रमुख संजय महाडिक, युवसेना राज्य विस्तारक सुधीर ढाणे, जिल्हा युवती अधिकारी धनवंती दाभाडे, माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, निलोफर पानसरे, उपसरपंच अकलाख पानसरे, माजी उपसरपंच सुरेश जैन, मोहन नागोठणेकर, शाखा प्रमुख धनंजय जगताप, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशपाक पानसरे, शब्बीर पानसरे, सगीर अधिकारी, बिलाल कुरेशी, नजीर पानसरे, शब्बीर अधिकारी, सुहेल पानसरे, इम्रान पानसरे, आसिफ मुल्ला, समीर भिकन, शबाना मुल्ला, शहनाज अधिकारी, कांचन माळी, लियाकत अधिकारी, अजिज पानसरे, सत्तार दफेदार, अबू पानसरे, संजय काकडे, ज्ञानेश्‍वर साळुंखे, अनिल महाडिक, दानिश अधिकारी, बाबा मुल्ला आदींसह नागोठणे ग्रा.पं. मधील शिवसेनेचे सर्व सदस्य, नागरिक व मोहल्ल्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याच सभेत सुवर्णा वाळुंज, मनीषा ठाकूर, निलोफर पानसरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. सभेचे सूत्रसंचालन कीर्तीकुमार कळस यांनी केले.

नागोठण्यातून चार हजारांचे मताधिक्य देणार : किशोर जैन
उद्धव साहेबांना शब्द दिल्याप्रमाणे नागोठणे ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता मिळविली. इंडिया आघाडीचा तो पहिला विजय होता. नागोठण्यातील पाया आम्ही विकासाच्या मुद्द्यावर रचला. सुकेळी व भिसे खिंडीमधून नागोठण्याकडे उतरलो की, एक घरही शिल्लक ठेवले नाही एवढे नागोठणे मजबूत केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये मी तीन हजार मतांनी निवडून आलो होतो. आता गीते साहेबांना नागोठणे विभागात चार ते पाच हजारांचे मताधिक्य देणार असल्याचा विश्‍वास शिवसेना नेते किशोर जैन यांनी व्यक्त केला.
भाजपाची जुलमी राजवट घालवणार : राजा ठाकूर
भाजपच्या राजवटीत अन्याय होत असल्यानेच या सभेला मुस्लीम महिला एवढ्या मोठ्या संख्येने आल्या आहेत. कोविड काळात टाळ्या, थाळ्या वाजविण्यास सांगणार्‍या मोदींनी एअरपोर्ट बंद केले असते तर देशात कोविड पसरला नसता. भ्रष्टाचारी असलेल्यांना हे सोबत घेऊन बसले. भविष्यात यांच्यामुळे देशात लोकशाही जाऊन हुकुमशाही येईल. त्यामुळे भाजपची जुलमी राजवट घालविण्यासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून आपण एकत्र आल्याचे यावेळी राजा ठाकूर यांनी स्पष्ट केले.
Exit mobile version