नवी मुंबई पोलीस दल झाले सुसज्ज

| पनवेल | वार्ताहर |

1 जुलैपासून तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अत्याधुनिक आणि अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. परंतु नवी मुंबई पोलिसांनी या अगोदरच चार पावले पुढे टाकली आहेत. त्यांच्याकडे दोन इन्वेस्टीगेशन कार सज्ज झालेल्या आहेत. त्यामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि इतर तांत्रिक बाबी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे राज्य पोलिसांमध्ये नवी मुंबई पोलीस दल खर्‍या अर्थाने ऍडव्हान्स असल्याचे दिसून येत आहे.

नवीन कायद्यानुसार कलम, शिक्षा, दंड याबाबत बदल करण्यात आले आहेत. याची अमंलबजावणी सुरु आहे.

Exit mobile version