राष्ट्रवादीने फसवेगिरीचे धंदे सोडावेत

मुळशी कातकरी वाडीतील पक्षप्रवेश चुकीचा
पेण । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील मुळशी कातकरी वाडीवरील शेकाप पक्षाच्या कार्यकर्त्यांना खोटे सांगून व दिशाभूल करुन आ.अनिकेत तटकरे, वसंत ओसावाल, गिता पालरेचा यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केल्याचा राष्ट्रवादी पक्षाकडून कांगावा करण्यात आला. खरी परिस्थिती काही वेगळीच होती.
मुळशी कातकरीवाडीतील ग्रामस्थांना सांगण्यात आले की, आपला रस्ता मंजुर करण्यात आलेला आहे. त्याचे पत्र देणार आहोत. हे पत्र घेण्यासाठी ग्रामस्थ गेले असता, मुळशी ग्रामस्थांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मफलरी अटकवून प्रवेश केल्याचे जाहीर केले. परंतु या ग्रामस्थांना हा सर्व डाव लक्षात आल्यानंतर त्यांनी मा.आ.धैर्यशिल पाटील यांच्याशी संपर्क करुन घडलेला सर्व प्रकार सांगितला व हे सर्व ग्रामस्थ आमदारांच्या निवासस्थानी जमले. आम्ही शेकापचे आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत शेकाप मध्येच राहू असे या ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी वसंत हिलम, मधु घोगरकर, वाल्या हिलम, विकास मोरे, तुकाराम हिलम, काशिनाथ मोरे, माया पवार, काळु जाधव, भुर्‍या पवार, सुन्या मोरे, माया मोरे, रवि मोरे, अंकुश जाधव, गोपाळ मोरे, चंद्रकांत हिलम, मधु हिलम, पांगा हिलम, बारकु मोरे, रवि वाघमारे, गणेश हिलम, पिंटु मोरे, तांबड हिलम, रडक्या हिलम, सुजीत मानकर अदि उपस्थित होते. तर आमदार धैर्यशिल पाटील यांच्या सदिच्छा भेटीच्यावेळी संदेश कुंभार सरपंच परळी आनाजी मनवे, अमोल देसाई, रामभाऊ आंगे्र, भास्कर पाटील सरपंच महागाव, अतिश सांगळे, सतिश पवार, भास्कर शेळके हे देखील उपस्थित होते.

Exit mobile version