नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
एनडीए आणि नौदल अॅकॅडमीत महिलांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी धोरणं तयार करण्यात येत आहे, यासाठी परीक्षेला पुढील वर्षापर्यंत स्थगिती देण्याच्या केंद्र सरकारच्या विनंतीला सुप्रीम कोर्टाने फेटाळलं आहे. सैन्य दलांनी स्वतःहून महिलांना एनडीएत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. सैन्य दलांनी लैंगिक समानतेच्याबाबतीत अधिक सक्रिय दृष्टीकोण अवलंबला पाहिजे, असं सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एस. के. कौल म्हणाले होते. या प्रकरणी कोर्टानं केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी दिला होती. आता सुप्रीम कोर्ट या प्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. आधीच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं एनडीए म्हणजे, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परीक्षेला बसण्याची परवानगी महिलांना दिली होती.