। रसायनी । वार्ताहर ।
कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान रायगड व उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील ‘नर्सिंग सहाय्यक’ हे प्रशिक्षण घेणार्या लाभार्थीसाठी एक दिवसीय ‘नर्सिंग सेवा प्रशिक्षण जनजागृती कार्यशाळेचे’ उद्घाटन संपन्न झाले. हा मार्गदर्शन कार्यक्रम राबवित असतांना या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, डॉ. विजय कोकणे, डॉ. राकेश सिंग, कुमार ठाकूर या मान्यवरांच्या उपस्थितीत व सचिन चव्हाण, रश्मी पाटील, राजश्री नाईक व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.