। श्रीवर्धन । वार्ताहर ।
कर्जत येथे प्रा.नामदेव जाधव यांच्या “आज छ.शिवाजी महाराज जिवंत असते तर” या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्यावेळी बोलत असताना आज देश अस्थिर आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक इत्यादी क्षेत्रात देश अतिशय कमकुवत झाला आहे. त्याला सावरण्याची गरज आहे असे उद्गार रायगड भूषण प्रा.एल.बी. पाटील यांनी काढले. आजच्या तरुणाईने व्यवसाय करावा. त्यासाठी उद्योजक शिबिरे आयोजित करावीत असेही ते म्हणाले. तसेच, जिल्हा शिव संस्थेच्या अध्यक्षपदी अॅड.गोपाळ शेळके यांची नेमणूक केल्याचेही प्रा.जाधव यांनी सांगितले. आपत्ती निवारण मार्गदर्शक जयपाल पाटील, विवेक पाठक, कोलंबे आदिंनीही या कार्यक्रमात आपले विचार मांडले. कवयित्री भारती ढाकवळ यांनी आभार प्रदर्शन केले.