भविष्याचा वेध घेऊन कार्य करण्याची गरज – अजित पवार

| अलिबाग | वार्ताहर |

रायगड फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन यांच्या आवाहनानुसार जिल्हास्तरीय वृक्षारोपण कार्यक्रमाचे एकाच दिवशी एकाच वेळी करण्याचे आयोजन केले होते. त्यानुसार अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन तर्फे रविवारी (दि. 7) रोजी खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील तळवली स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. चिकू, पेरू, सीताफळ, अश्या प्रकारच्या 50 फळ झाडांची लागवड करण्यात आली. ही झाड जतन करण्यासाठी या वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित खंडाळे सरपंच नाशिकेत कावजी यांनी ठिबक सिंचन करून देणार असल्याचे आश्वासित केले आहे. 

कार्य तर सर्वच संघटना करत असतात परंतु भविष्याचा वेध घेऊन कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन या वृक्षरोपण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी केले. यावेळी ग्रामपंचाय खंडाळे माजी उपसरपंच अनंत वैद्य, रायगड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन उपाध्यक्ष समीर मालोदे, अलिबाग तालुका अध्यक्ष तुषार थळे, सचिव विकास पाटील,  खजिनदार विवेक पाटील, कार्याध्यक्ष सुदेश माळी, ज्येष्ठ छायाचित्रकार सुरेश  खडपे, विजय पाटील, गणेश जाधव, सोनू असरणी, मार्मिक पाटील, संदेश कवळे,  निवृत्ती कोळी, वैभव शिंदे, कुणाल थळे, भूषण पाटील, विराज घरत, योगेश सावंत, अनिकेत म्हात्रे, निलेश दुदम, अमर मढवी, मनोज पाटील,  सुरेंद्र वेळे, सुधीर पाटील, दिप नाईक व  तळवळी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमास रोपे उपलब्ध करून देण्यात सामाजिक वनीकरणचे वनाधिकारी प्रसाद गायकवाड यांचे विशेष योगदान लाभले.

Exit mobile version