| नेरळ | वार्ताहर |
सतत दोन दिवस कोळणार्या पावसामुळे रविवारी पहाटेच्या सुमारास नेरळ-माथेरान घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, रस्त्यावर मोठ मोठे दगड आल्याने काही काळ रस्ता बंद झाला होता. स्थानिक टॅक्सी चालकांना समजल्यानंतर त्यांनी त्वरित हा रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न केले. आणि हा रस्ता मोकळा झाल्या त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
माथेरान घाटात अनेक ठिकाणी दरड कोसणारा भाग आहे. तिथे संरक्षक जाळी बनवावी अशी मागणी माथेरान नागरिकांसह पर्यटकांकडून अनेक वर्षांपासून होत आहे. असे असताना आजपर्यंत यावर कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाही. काही ठिकाणी संरक्षक जाळी बसवली आहे. परंतु, ज्या ठिकाणी दरडीचा धोका असे अशा सर्वंच ठिकाणी या संरक्षक जळ्यांची आवश्यकता आहे. त्यामुळं स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासने यावर लक्ष केंद्रित करून हा धोका दूर करावा, अशी मागणी होत आहे.