नवीन वर्षाचा सूर्य आभाळा आड

| नेरळ | प्रतिनिधी |

नवीन वर्षाचे स्वागत हे उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन अनेक जण करतात. मात्र, 1 जानेवारी रोजी इंग्रजी वर्षाचे स्वागत करण्यासाठी सकाळी पूर्वेकडे सूर्य कधी उगवते याकडे नजर लावून बसले होते. परंतु, यावेळी आभाळ दाटल्याने उगवत्या सूर्याचे दर्शन चक्क साडे नऊ वाजता झाले. मात्र, त्यापूर्वी पावसाने नवीन वर्षाचे स्वागत पाण्याचा शिडकावा करून केला.

2025 या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक थंड हवेचे ठिकाणी, रिसॉर्ट वर आणि समुद्रकिनारी गर्दी करून होते. त्यांनी सरत्या वर्षाला निरोप मध्यरात्री बारापर्यंत दिला आणि बारा वाजल्यानंतर 2026 सुरू झाल्याचा आनंद फटाके फोडून मिठाई वाटून केला.त्यासाठी रिसॉर्टवर पार्ट्या रंगल्या होत्या. मात्र 2026 या इंग्रजी वर्ष सुरू होत असताना या सालाच्या पहिल्या सकाळी बराच काळ सूर्य आकाशात दिसून आला नाही. त्यानंतर सकाळी सात ते आठमध्ये पावसाचा शिडकावा अनेक ठिकाणी सुरू होता. कर्जत तालुक्यात सर्वत्र सकाळी आभाळात धुक्याची दुलई होती आणि त्यात ढग देखील होते. त्यामुळे गुरूवारच्या सूर्योदयाची वेळ सकाळी 7 वाजून 14 मिनिटे असताना अगदी त्याच वेळी आभाळ दाटले होते. त्यामुळे सूर्य कधी दर्शन देणार? याची वाट नवीन वर्षाचे स्वागत करण्याची वाट पाहत असलेले पाहत होते. शेवटी पावसाचा लहानसा शिडकावा पूर्ण होऊन गेल्यावर साडे नऊचे सुमारास सूर्याचे या वर्षातील पहिले दर्शन घडले. त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत यावर्षी प्रथमच अगदी सकाळी सूर्याचे दर्शन न झाल्याने करता आले नाही.

Exit mobile version