पुढील तीन दिवस धोक्याचे

| मुंबई | प्रतिनिधी |

दिवसेंदिवस राज्यातील तापमानात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानाचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेषतः विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेची लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा उच्चांकी तापणार आहे. पुढील तीन दिवसात राज्यातील उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांना उन्हाचा येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आली आहे.

Exit mobile version