नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात 43 हजार 159 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 38 हजार 525 लोक उपचार घेत बरे झाले तर 640 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
याचबरोबर सक्रिय प्रकरणांत ही वाढ होत आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 97 हजार 330 आहे. बुधवारी या आकडेवारीत 3 हजार 987 ने वाढ झाली आहे. हा आकडा गेल्या 77 दिवसातील सर्वात जास्त असल्याचे सांगितले जात आहे. देशातील काही राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत आहे. परंतु, केरळ राज्यात गेल्या 24 तासात 22 हजार प्रकरणांची नोंद झाली आहे. काल 27 जुलै रोजी 22 हजार 129 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे देशात केरळ एकमेव असे राज्य आहे ज्यामध्ये दीड लाख लोकांवर उपचार सुरु आहे. कोरोनाच्या येणार्या नवीन प्रकरणांमुळे चिंतेत वाढ होत आहे.