आतापर्यंत जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या 1 लाख 57 हजारांवर

3 हजार 866 जणांचा मृत्यू; तर 1 लाख 48 हजार 857 कोरोनामुक्त
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 57 हजार 005 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 48 हजार 857 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 3 हजार 866 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 4 हजार 282 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 12 ते 18 जुलै दरम्यान आठवडाभरात 69 हजार 997 जणांच्या चाचण्या झाल्या असून जिल्ह्याचा पॉझेटिव्हीटी रेट 4.86 झाला आहे. तर आरटीपीसीआर पॉझेटिव्हीटी रेट 4.77 एवढा आहे.

रायगड जिल्ह्यात मंगळवार दिनांक 20 जुलै रोजी नव्याने 321 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 494 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 71, पनवेल ग्रामीण 25, उरण 10, खालापूर 26, कर्जत 6, पेण 14, अलिबाग 56, मुरुड 5, तळा 5, माणगाव 28, रोहा 20, श्रीवर्धन 20, सुधागड 4, म्हसळा 10, महाड 15, पोलादपूर 6 असे एकूण 321 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर पनवेल मनपा क्षेत्र, कर्जत तालुका, पेण, मूरुड तालुक्यातील प्रत्येकी एक तर रोहा तालुक्यातील पाच अशा 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तर बरे झाल्याने कोरोनामुक्त झाल्याचे घोषीत करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा 195, पनवेल ग्रामीण 51, उरण 6, खालापूर 23, कर्जत 11, पेण 28, अलिबाग 76, मुरुड 3, माणगाव 26, तळा 2, सुधागड 10, रोहा 39, श्रीवर्धन 5, म्हसळा 1, महाड 16, पोलादपूर 2 असे एकूण 494 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

Exit mobile version