सावधान! ‘हा’ पूल धोकादायक

पावसाळ्यात वेळप्रसंगी अपघाताची शक्यता
तातडीने उपाययोजना करण्याची वाहनचालक, ग्रामस्थांतून मागणी
| कोर्लई | वार्ताहर |
अलिबाग-मुरुड रस्त्यावर काशिद बीच ते काशिददरम्यान गेली पन्नास वर्षे जुना असलेल्या पुलाची पार दुरवस्था झाली आहे. हा पूल खचलेल्या अवस्थेत असून, ऐन पावसाळ्यात वेळप्रसंगी केव्हाही पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थांतून होत आहे.


अलिबाग-साळाव-मुरुड रस्त्यावर काशिद बीच ते काशिददरम्यान अभिषेक काते यांच्या काशिद सी फेस हॉटेल जवळपास रस्त्यावर असलेल्या या जुन्या पुलाची गेल्या वर्षांपासून पार दुरवस्था झालेली असून, पुलाचा स्लॅब खचून पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे, तसेच गेल्या काही दिवसांपासून या पुलाचा स्लॅब खचून रस्त्यावर खड्डा (खाच) पडून वेळप्रसंगी केव्हाही अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून यात तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थांतून होत आहे.

Exit mobile version