। पनवेल । वार्ताहर ।
पोलीस असल्याची बतावणी करून एका 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सात ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरल्याची घटना कर्नाळा सर्कल येथील भाजी मार्केटमध्ये घडली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील तोतया पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे. सुकीर भोईर (70) हे धाकटा खांदा येथील रहिवासी असून, ते पनवेल येथील वीजबिल भरण्यासाठी गेले होते. भोईर हे कर्नाळा सर्कल येथील भाजी मार्केटजवळ आले असताना एका व्यक्तीने त्यांना पोलीस असल्याची बतावणी हातचलाखीने गळ्यातील सोनसाखळी ती चोरली. याप्रकरणी भोईर यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.