| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नॅशनल टेस्टींग एजन्सी म्हणजेच एनटीए मार्फत घेण्यात येणारी युजीसी-नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. युजीसी नेट परीक्षेच्या पेपरफुटीवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर गृहमंत्रालयाने शिक्षण विभागाला युजीटी नेट परीक्षेत घोटाळा झाल्याचे सांगितले. त्यानंतर, शिक्षण मंत्रालयाने संबंधित नेट परीक्षेचा पेपर रद्द केला आहे. याप्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयने नेट पेपर फुटल्याचे म्हटले आहे. युजीसीट नेट परीक्षेचा पेपर लीक झाला होता, परीक्षेच्या एक दिवस अगोदर हा पेपर लीक होऊन डार्कनेटवर टाकण्यात आला होता, असेही सीबीआयने म्हटलं आहे.




