नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या पुष्पा दगडे विजयी
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी आणि इतर मित्र पक्षांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा हरिश्चंद्र दगडे 4470 मतांनी विजयी झाल्या आहेत, त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या डॉ. स्वाती अक्षय लाड यांचा पराभव केला आहे.
कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी व इतर मित्र पक्षांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत परिवर्तन विकास आघाडी स्थापन करण्यात आली होती तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय यांची महायुती करण्यात आली होती, निवडणुकीत नगर परिषदेवर कर्जत परिवर्तन विकास आघाडीने झेंडा फडकवला आहे, यामध्ये कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या राष्ट्रवादीचे-8, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे-4, अपक्ष-1 असे 13 उमेदवार निवडून आले आहेत, तर महायुतीमध्ये शिंदे गटाचे-7, भाजपचा-1 असे आठ उमेदवार निवडून आले आहेत.
प्रभाग क्रमांक 1 अ) अरुणा प्रदीप वायकर : शिवसेना शिंदे गट : विजयी (1197) , ब) किशोर पांडुरंग कदम : शिवसेना शिंदे गट : विजयी (956), प्रभाग क्रमांक 2 अ) कोयल चैतन्य कन्हेरीकर : शिवसेना शिंदे गट : विजयी (1306), ब) संकेत जनार्धन भासे: शिवसेना शिंदे गट : विजयी (1439). प्रभाग क्रमांक 3 अ) अंजली अतुल कडू राष्ट्रवादी गट : विजयी (1167), ब) संतोष सुरेश पाटील : उबाठा गट : विजयी (936). प्रभाग क्रमांक 4 अ) सुमिता योगेश गायकवाड राष्ट्रवादी गट : विजयी (1194), ब) महेंद्र बबन चंदन : राष्ट्रवादी गट : विजयी (1563). प्रभाग क्रमांक 5 अ ) राधिका पिंट्या पवार राष्ट्रवादी गट : विजयी (934), ब) विजय किसन हजारे शिवसेना शिंदे गट : विजयी (867). प्रभाग क्रमांक 6 अ) सुवर्ण केतन जोशी उबाठा गट : विजयी (1477), ब) प्रशांत वसंत पाटील अपक्ष (परिवर्तन आघाडी पुरस्कृत) गट : विजयी (1397). प्रभाग क्रमांक 7 अ) वैभव हेमंत सुरावकर शिवसेना शिंदे गट : विजयी (1276 ), ब) नेहा निलेश शिंदे राष्ट्रवादी गट : विजयी (1092). प्रभाग क्रमांक 8 अ) रामदास आत्माराम गायकवाड भाजपा गट : विजयी (923), ब) सुचिता देवेंद्र खोत उबाठा गट : विजयी (1344), प्रभाग क्रमांक 9 अ) कुमेश पांडुरंग मोरे राष्ट्रवादी गट : विजयी (1441), ब) जानवी सुदेश देवघरे शिवसेना शिंदे गट : विजयी (1251). प्रभाग क्रमांक 10 अ) हर्षाली उमेश गायकवाड राष्ट्रवादी गट : विजयी (1762), ब) अशोक बबन राऊत राष्ट्रवादी गट : विजयी (1479), क) मानसी महेंद्र कानिटकर उबाठा गट : विजयी (1580).
निवडणुकीअगोदर ज्या-ज्या उमेदवारांनी पक्ष बदलले, ते सर्व या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.







