प्रवाशांनी मानले श्रीवर्धन आगार व्यवस्थापकांचे आभार

| श्रीवर्धन | वार्ताहर |

आगार व्यवस्थापक मणेर यांनी काही दिवसांपूर्वीच वाहक-चालकांसाठी एक लेखी आदेशकाढून माणगाव-महाड-गोरेगाव भागांतून येणाऱ्या एस.टी.च्या साध्या गाड्या बायपासमार्गे येऊन म्हसळा स्थानकावर नोंद करुनच पुढे जातील अशा सुचना आगार व्यवस्थापक मणेर यांनी केल्या आहेत. त्यानुसार आता श्रीवर्धन, हरेश्वर कडे जाणाऱ्या प्रवाशांना सुमारे एक कि.मी दूरवर न येता म्हसळा स्थानकावरच माणगाव, महाड, पुणे, भाईंदर, मुंबई, लातूर, बीड, डोंगरी येथून येणाऱ्या बसेस मिळण्याचा र्माग मोकळा झाला आहे. प्रवांशांनी आगार व्यवस्थापकांचे आभार मानले आहेत. म्हसळा शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याकरिता गेली काही वर्षे म्हसळा शहरांतून फक्त एस.टी गाड्यांसाठी एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी काही अंशी कमी झाली.

या निर्णयाप्रमाणे हरेश्वर, श्रीवर्धन कडे येणा-या एस.टी बसेस म्हसळा स्थानकावर न येता बाह्य वळणमार्गाने जाऊन म्हसळे शहराबाहेरील मराठी माध्यमहायस्कूलजवळ थांबत असत. परंतु तेथे जाण्याकरीता म्हसळा स्थानकावरील प्रवाशांना एक तर सुमारे एक कि.मी.ची पायपीट तरी करावी लागत असे किंवा रिक्षा भाडे द्यावे लागत असे. शिवाय तेथे अद्याप शेडही नसल्याने प्रवाशांना ऊन-पावसात देखील एस.टी.ची वाट पहात तिष्ठत रहावे लागत असे. या गैरसोयीबद्दल आदित्य जोशी यांनी विविध पातळ्यांवर आवाज उठविला होता. तसेच माध्यमांनीही याबद्दल वृत्तपत्रांतून आवाज उठविला होता. या सर्व प्रयत्नांना यश आले आहे. दरम्यान, गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन आगाराकडून माहिती घेता समजले की, आगाराकडे सध्या एकूण 49 बसेस आहेत. शिवशाही 05, स्लीपर 08, सेमी 03, तर 33 गाड्या या साध्या आहेत. गणपतीसणासाठी 24 सप्टेंबर पासून नालासोपारा 09 बसेस, बोरीवली 02 आणि नानवेल-मुंबई अशा गाड्या आगारातून सोडण्यात येणार असून ग्रुप बुकींगही सुरु करण्यात आले आहे. महिला प्रवाशांना एस.टी.तिकिटात अर्ध्या प्रवासीभाड्याची सवलत शासनाने जाहीर केल्यापासून श्रीवर्धन आगारामध्येही या सवलतीचा लाभ अधिकाधिक महिलाघेत आहेत. आगाराकडून प्राप्त माहितीनुसार माहे जुलै 23 मध्ये श्रीवर्धन आगाराकडून एकूण एक लाख 40 हजार 926 महिला प्रवाशांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे.

Exit mobile version