पेमास्टर विहिर पुनर्जीवित

प्रशासक सुरेखा भणगेंचा पुढाकार

| माथेरान । वार्ताहर ।

माथेरानमधील इंदिरा गांधी नगर भागातील जवळपास शंभर वर्षे जुन्या असलेल्या विहिरीला पुनर्जीवित करण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगेंनी पुढाकार घेतला आहे. या विहिरीतील गाळ त्याचप्रमाणे कचरा गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात ही जुनी विहीर असून अनेक वर्षांपासून बंद करण्यात आली आहे.


या भागातील नागरिकांना अनेकदा पाण्याची कमतरता भासत असते. खूपच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या विहिरीचा वापर सुरू नागरिकांच्या अडचणींवर काहीशा प्रमाणात मात करता येऊ शकते. याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. याकामी या विहिरीत असणारा कचरा काढला जात आहे. ही विहीर पूर्णपणे भरल्यास या भागाला पाण्याची उणीव भासणार नाही. त्यासाठी स्वतः प्रशासक सुरेखा भणगे शिंदेंनी प्रत्यक्ष हजर राहुन या विहिरीची स्वच्छता करून घेतली आहे. लवकरच या ठिकाणी पाण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Exit mobile version