| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील आक्षी येथे शेकाप व महाविकास आघाडीचे चेंढरे मतदार संघातील जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रविणा घासे व आक्षी पंचायत समितीचे उमेदवार प्रफुल्ल पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. येथील काळंबा देवीच्या मंदिरात ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रचारादरम्यान आक्षी व साखर परिसरात मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. यावेळी शेकापचे उमेदवार प्रविणा घासे व प्रफुल्ल पाटील यांच्यासह शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, आक्षी सरपंच रश्मी पाटील, उपसरपंच आनंद बुरांडे, माजी सरपंच नंदकुमार वाळंज, सदस्य विनायक पाटील, रश्मी वाळंज, निरजा नाईक, काँग्रेस नेते प्रभाकर राणे, जि.प. माजी सदस्या अश्लेषा नाईक, शेकाप कार्यकर्ते विलास राणे, रवींद्र पाटील, उल्हास भाटे, रश्मी गुरव, रमण पाटील, शिवनाथ पाटील, सुनील नाईक, अभिजित वाळंज, नितीन सारंग, रमेश केणी, संतोष राऊळ, प्रणित गुरव व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते व महिल्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
