सडवलीतील आदिवासी बांधवांचा शिवसेना पक्षप्रवेश
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
विकासाच्या थापा मारणार्या आमदारांना जनता कंटाळली आहे. सर्वसामान्य जनतेला गरीबच ठेऊन स्वतःच्या बगलबच्च्यांनाच आमदार शेठ बनवित असल्याची कडवट टीका महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी केली. महाडच्या कॅप्टन जगताप बंगला येथे सडवलीतील शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी विधानसभा उमेदवार स्नेहल माणिक जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी स्नेहल जगताप-कामत बोलत होत्या. तसेच ही तर सुरुवात आहे आगे-आगे देखो होता हैं क्या? असं सूचक वक्तव्यही स्नेहल जगताप यांनी केले.
यावेळी दिलीप भागवत, मंगेश मोरे, दिनेश मोरे, सचिन दुदुस्कर, सचिन पवार,अनिल पवार, अभिषेक गरुड, तेजस, धोंडीराम जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी माजी सरपंच ताई नथु पवार,बाळू पवार, नथु पवार, रामदास मुकणे, वनिता मुकणे, लीला मुकणे, दिलीप वाघे, गौरी वाघे, सुषमा वाघे, दिलीप वाघे, संदीप मुकणे, गणपत वाघे, दिलीप हिलम, काशीराम हिलम, रवींद्र हिलम, सोमनाथ वाघमारे, रोहन पवार, राकेश मुकणे, नारायण वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, रामा वाघमारे यांच्यासह संपूर्ण आदिवासी वाडीने शिंदे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.