चार दिवसात 50 अर्जांवर प्रक्रीया
| अलिबाग | प्रमोद जाधव |
अलिबागमध्ये दिर्घ प्रतिक्षेनंतर गेल्या चार दिवसापासून पासपोर्ट कार्यालय सुरु झाले आहे. या पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांची लगबग सुरु झाली आहे. या कार्यालयाकडून आतापर्यंत 400 अर्जांची पडताळणी केली असून 250 अर्जांवर प्रक्रीया झाल्याचे पासपोर्ट कार्यालयाकडून सांगण्यात आले.
अलिबागमध्ये 5 ऑगस्टपासून पासपोर्ट कार्यालय सुरु झाले आहे. या कार्यालयात पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांची लगबग सुरु झाली आहे. सुरुवातीला फारशी गर्दी नसल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. एका दिवसात 40 अर्जांची पडताळणी केली जाते. कार्यालयाच्या बाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यानंतर कार्यालयाच्या आतमध्ये असलेल्या तीन टेबलवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे अंतिम पडताळणी केली जात आहे. सध्या पासपोर्टसाठी फारसी गर्दी नसल्याने उपलब्ध तीन कर्मचाऱ्यांमार्फत पडताळणीची कामे होत आहेत. प्रत्येक नागरिकांना पडताळणीसाठी अर्धा तास लागत असल्याने उशीर होत नसल्याचे पहावयास मिळत आहे.
दरम्यान, पासपोर्ट काढण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीशी संवाद साधला. ते श्रीवर्धन तालुक्यातील असून त्यांचे नाव इरफान असल्याचे सांगितले. ते म्हणाले, अलिबागमध्ये पासपोर्ट कार्यालय आल्याने खुप आनंद आहे. पुर्वी ठाण्यामध्ये पासपोर्ट साठी जावे लागत असल्याने खुप त्रास झाला होता. मात्र आता अलिबागमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु झाल्याने समाधान व्यक्त केेले जात असल्याचे त्याने कृषीवलशी बोलताना सांगितले. पासपोर्ट अधिकाऱ्याशी संवाद साधल्यावर त्याने 26 जूलैपासून ते आजपर्यंत 400 जणांची तपासणी केली आहे. 250 जणांचे प्रक्रीया पुर्ण झाल्याची माहिती दिलीआहे. दिवसाला 40 जणांची पडताळणी केली जात असून सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांद्वारे योग्य पध्दतीने काम चालत असल्याचे त्यांनी सांगितले.
पासपोर्टसाठी लागणारे कागदपत्रे
आधार कार्ड, पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, मार्कलिस्ट
ई-आधारकार्ड मान्यता
अधार कार्ड हे महत्वाचे मानले जाते. स्मार्ट कार्ड म्हणून प्रत्येकाच्या खिशात अधारकार्ड ठेवला जातो. परंतु पासपोर्टसाठी सही असलेले पुर्ण अधारकार्डला मान्यता आहे. फक्त स्मार्टकार्ड असेल तर ते ग्राह्य धरले जाणार नसल्याचे तेथील कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ई-अधारकार्ड सही असलेल्या अधारकार्डलाच मान्यता असल्याचे समोर आले आहे.
काळ्या फिती लावून कामकाज
अलिबाग येथील पासपोर्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज सुरु असल्याचे दिसून आले. यावेळी विचारणा केली असता, शनिवारी सुट्टीच्या दिवशी काम करण्याचे आदेश मंत्रालयाने काढल्याने काळ्या फिती लावून काम करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. देशभर एकाच दिवशी हा निषेध करण्यात आल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.