कर्जतमध्ये मंगळागौर स्पर्धेचे आयोजन

| कर्जत | वार्ताहर |

कर्जत तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने श्रावणसरी व मंगळागौर स्पर्धेचे आयोजन रॉयल गार्डनच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला भाग्य दिले तू मला फेम अभिनेत्री तन्वी मुंडले, पूजा बिरारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, अशोक भोपतराव, एकनाथ धुळे, भगवान भोईर, अशोक सावंत, दगडू कराळे, स्वप्नील पालकर, सोमनाथ पालकर, शिवाजी खारीक, अविनाश कडू, बळीराम देशमुख, महेंद्र बडेकर, उमेश गायकवाड, भारती पालकर, जया भोईर आदी उपस्थित होते.

यावेळी गाणी, फुगड्या, भेंड्या, उखाणे, आदी विविध कार्यक्रम करून हसत खेळत मंगळागौर जागवली असे तरूणींसह वृद्ध महिलांनी देखील खेळ खेळून नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. अभिनेत्री तन्वी मुंडले, या जगात धावपळीच्या युगात परंपरा कमी झाल्या आहेत. दैनंदिन कामकाजातून महिलांनी स्वतःसाठी वेळ काढणे कठीण झाले आहे, म्हणून मंगळागौर, भोंडला असे अनेक छोटे छोटे कार्यक्रम पडद्या आड होत आहेत. त्यांना पुन्हा वाव देण्यासाठी महिलांनी एकत्र येऊन आपले सुख दुःख एकमेकींसोबत वाटत परंपरा महिलांनी जपली आहे. तसेच स्वत:ची आवड जोपासता यावी. मंगळागौर सणाचे विशेष महत्त्व सर्वांना कळावे. यासाठी प्रत्येक ठिकाणी मंगळागौरचे आयोजन केले जातं आहे असे सांगितले. सूत्रसंचालन प्रमोद देशमुख यांनी केले. याप्रसंगी जगदीश देशमुख, स्वाती कुंभार, राजश्री कोकाटे यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.

Exit mobile version