धनशक्तीला जनताच धूळ चारणार: जयंत पाटील

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सुशिक्षित आणि तरुण उमेदवार आपण उभे केले आहेत. प्रचारामध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. शेकापसह महाविकास आघाडीमधील वेगवेगळ्या गावे, वाड्यांतील तळागाळातील कार्यकर्ता एकरूप झाला आहे. मोठ्या जिद्दीने आणि चिडीने प्रचाराच्या कामाला लागले आहेत. या निवडणुकीत विरोधकांविरोधात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपल्या पाठीशी जनता आहे, हे स्पष्ट आहे. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. या लढाईत धनशक्तीला जनताच धूळ चारणार आहे, अशा विश्वास शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

अलिबाग तालुक्यातील नागाव येथे नंदकुमार मयेकर यांच्या निवासस्थानी प्रचारादम्यान सभेचे आयोजन रविवारी (दि.1) सायंकाळी करण्यात आले. यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी चौल जिल्हा परिषद मतदार संघातील शेकाप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे, रेवदंडा पंचायत समिती मतदार संघातील शेकाप-महाविकास आघाडीचे उमेदवार राकेश म्हात्रे, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, नागावचे सदस्य निखिल मयेकर, श्रीकांत आठवले, सुरेश खोत, निलेश खोत, राजू मयेकर, प्रियांका काठे, उपसरपंच मंगला नागे, सुरेंद्र नागलेकर, रोहिनी म्हात्रे, आदेश मोरे आदींसह शेकाप, शिवसेना महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व तरुण उपस्थित होते.

अलिबाग तालुक्यामध्ये महाविकास आघाडीतून निवडणूक लढवित आहोत. महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण आहे. प्रचाराच्या दरम्यान कार्यकर्त्यांसह मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. खारेपाटात दहापेक्षा अधिक बैठका झाल्या. या बैठकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला. निवडणुकीत सुशिक्षित आणि तरुण उमेदवार आपण उभे केले आहेत. प्रचारामध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. शेकापसह महाविकास आघाडीमधील वेगवेगळ्या गावे, वाड्यांतील तळागाळातील कार्यकर्ता एकरूप झाला आहे. मोठ्या जिद्दीने आणि चिडीने प्रचाराच्या कामाला लागले आहेत. या निवडणुकीत विरोधकांविरोधात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपल्या पाठीशी जनता आहे, हे स्पष्ट आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई आहे. या लढाईत धनशक्तीला जनशक्तीच धूळ चारणार आहे, अशा विश्वास आहे. हिंदुत्वाच्या नावावर मते मागून अंतर्गत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत आहेत. हा प्रकार थांबला पाहिजे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून चौल मतदार संघातील उमेदवार सुरेंद्र म्हात्रे आणि रेवदंडा पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार राकेश म्हात्रे यांना उभे केले आहे. महाविकास आघाडीला वातावरण चांगले आहे. गाफील न राहता, योग्य पद्धतीने नियोजन करून बूथ स्तरावर प्रचार करून घरोघरी मतदारांना भेटा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

Exit mobile version