पिकअप टेम्पो पलटी

| पनवेल | वार्ताहर |

कोंबड्या घेऊन जाणारा पिकअप टेम्पो पलटी झाल्याची घटना आकुर्ली बस स्टॉपजवळ आज पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. या अपघातात जवळपास दीडशे ते दोनशे कोंबड्या मृत झाल्याची माहिती समोर आली आहे. कोंबड्या भरलेला पिकअप टेम्पो नेरेच्या दिशेने जात होता. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आकुर्ली बस स्टॉप जवळ कोंबड्यांनी भरलेला एक टेम्पो पलटी झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, यातील दीडशे ते 200 कोंबड्या मृत पावल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर तासाभरात क्रेनच्या साह्याने हा पिकअप टेम्पो उभा करण्यात आला.

Exit mobile version