79 उमेदवारांपैकी कोण घेणार माघार लागले सर्वांचे लक्ष
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा अनारक्षित करून घेण्यात येत असलेल्या सर्वसाधारण प्रवर्गा जागांसाठी होणार्या निवडणूकीसाठी जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीतून 21 जागांसाठी 102 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. छाननीमध्ये 23 अर्ज अवैध ठरले रिंगणात 79 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. आज सोमवार 10 जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
जिल्ह्यातील सहा पैकी खालापूर नगरपंचायतीच्या एका जागेसाठी 5 अर्ज शिल्लक राहिले आहेत. माणगावसाठी 16 अर्ज दाखल आहेत. म्हसळा नगरपंचायतीसाठी 8 अर्ज, पोलादपूरमध्ये 12 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. तळा नगरपंचायतीत 18 अर्ज वैध ठरले आहेत. पालीत निवडणूक रिंगणात 20 अर्ज शिल्लक राहिले आहेत. आज सोमवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. 6 नगर पंचायतीतील 79 वैध उमेदवारी अर्ज पैकी किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात हे स्पष्ट झाल्यानंतर लढतीचे खरे चित्र पाहायला मिळेल. ओबीसीतून खुल्या प्रवर्गात गेलेल्या या जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होईल. त्यानंतर 19 जानेवारी रोजी त्याचा निकाल जाहीर केला जाईल.