पायलटला हृदयविकाराचा झटका

मुंबई । वृत्तसंस्था ।
मस्कतहून ढाकाकडे येणार्‍या बांगलादेशच्या प्रवासी विमानाला नागपुरात आपत्कालीन लँडिंग करावे लागले आहे. जेव्हा हे विमान रायपूरवर होते, तेव्हा त्याच्या पायलटला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर विमानाने ताबडतोब कोलकाता एटीसीशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. वैमानकाच्या प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच कोलकाता एटीसीने समन्वयाने विमानाला नागपूर विमानतळावर उतरण्याचे निर्देश दिले.

Exit mobile version