| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील पिंगळसई येथे मागील दोन- तीन दिवसांपूर्वी जंगल भागात लागलेल्या वणव्याने पिंगळसईचे जंगल अक्षरक्ष: होरपळले असून, जंगल संपत्तीची प्रचंड हानी झाली आहे.
रोहा सामाजिक वनीकरण विभागामार्फत शून्य वणवा ही संकल्पना राबविली जात असतानाच वणवा लावून जंगल संपत्तीची हानी करणारे एकार्थी वन विभागाला आव्हानच देत आहेत. तर दरवर्षी तालुक्यातील जंगल भागात लावल्या जाणाऱ्या वणव्यांमुळे जंगलसंपत्तीची विपरित होत असून, पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून याबाबत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली जात आहे. विविध कारणांसाठी लावल्या जात असलेल्या वणव्यांमुळे जंगलसंपत्तीची तर हानी होतेच. तर याशिवाय जंगलभागात वास्तव्यास असणाऱ्या अन्य सजीव प्राणी यांचाही निवारा नष्ट होऊ लागला आहे. पिंगळसई येथे लावण्यात आलेल्या वणव्याने जंगल संपत्तीची प्रचंड प्रमाणात हानी झाली असल्याने याबाबत पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून प्रचंड चिड व्यक्त केली जात आहे.
पिंगळसईचे जंगल वणव्याने होरपळले
