अखेर रस्तादुरुस्तीच्या कामाला शुभारंभ
| पनवेल | प्रतिनिधी |
सिडकोच्या करंजाडे वसाहतीतील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. रस्त्यांचे डांबर गेले आहे. त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, खडी रस्त्यावर आली आहे. वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांचीही अनेक भागांत चाळण झाली आहे. यामुळे चालकांचे कंबरडे मोडले आहे. यावेळी गेल्या तीन वर्षांपासून माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी अखंड पाठपुव्यामुळे सिडकोने खड्डे दुरुस्तीसाठी निविदा प्रसिद्ध केली आणि शनिवारी, दि.6 जानेवारी रोजी रस्त्यांचे उदघाट्न करण्यात आले आहे. आहे. त्यामुळे वसाहत खड्डेमुक्त होणार असल्याची माहिती रामेश्वर आंग्रे यांनी दिली.
यावेळी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, रंजीत नरूटे सरचिटणीस राष्ट्रवादी, संदीप चव्हाण उपशहरप्रमुख शिवसेना, निवास पाटील, केतन आंग्रे, शेकाप शहर अध्यक्ष करंजाडे योगेश राणे, उमेश भोईर, राहुल घुळे, अक्षय वेळासकर यांच्यासह सिडको अधिकारी व दिवेकर कार्यकारी अभियंता सिडको, उंबरकर अभियंता सिडको, ठेकेदार अजवाणी ग्रुप जनरल मॅनेजर शिवाजी सहाणे व इतर प्रोजेक्ट मॅनेजर कर्मचारी आदी उपस्थित.
करंजाडे वसाहतीमध्ये दोन लाखांच्या आसपास लोकसंख्या पोहोचली आहे. त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी चिंचपाडा, कोपर, कोल्ही या गावांचे पुनर्वसनदेखील करंजाडे परिसरात केले आहे. त्यामुळे नागरिकांची रहदारीचे प्रमाण वाढले आहे. करंजाडे या परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. करंजाडे सेक्टर 2, 3, 4, 5, 6 येथे मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणचे रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे सिडको अधिकार्यांनी करंजाडे वसाहतीची पाहणी करून खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करावे यासाठी रामेश्वर आंग्रे यांनी गेले तीन वर्षे यशस्वी पाठवपुरावा केला. त्याचबरोबर चंद्रकांत गुजर, किरण मुंबईकर, कुणाल लोंढे, गौरव गायकवाड, समीर केणी यांनीदेखील वारंवार सिडकोकडे खड्डे दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला. यानुसार याची दखल घेत सिडकोने करंजाडे वसाहतीतील सेक्टर 1 ते 6 भागातील सर्व खड्डे दुरुस्त करण्याचे निविदा प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार शनिवार, दि. 6 जानेवारी रोजी सकाळी सेक्टर 6 येथे रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे लवकरच करंजाडे वसाहत खड्डेमुक्त होणार असल्याची माहिती रामेश्वर आंग्रे यांनी दिली.