बारामतीत प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले

बारामती तालुक्यातील कटफल येथे शिकाऊ विमान कोसळले. बारामतीतील रेडबर्ड कंपनीचे शिकाऊ विमान उतरवताना कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये पायलट शक्तीसिंग यांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने ही दुखापत गंभीर नसल्याचे समजते. कटफल इथे वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते . अनेक पायलट इथे विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेऊन तयार होतात.

गेल्या काही दिवसापासून इथे जोरदार प्रशिक्षण सुरु आहे. पुणे आणि शेजारील जिल्ह्यातही या विमानांच्या घिरट्या पाहायला मिळतात. आजही असेच प्रशिक्षण सुरु होते . दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.

Exit mobile version