| चणेरा | प्रतिनिधी |
एमआयडीसीमध्ये प्रवेश करताना किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना दिशादर्शक फलक नसल्यास लोकांना किंवा वाहक चालकांना अडचणी येतात. त्यामुळे, दिशादर्शक फलक लावणे आवश्यक आहे. अशातच औद्योगिक वसाहतीतील रेपटाकोर्स येथे एमआयडीसीची हद्द समाप्त होत असून लगतच मलंखडवाडी हे गाव आहे. या गावात अवजड वाहनचालकाने व्यवस्थितपणे गुगल मॅपचा वापर न केल्यामुळे व एमआयडीसीची हद्द फलक नसल्यामुळे थेट केमिकलने भरलेला टँकर गाव रस्त्यात घुसवला. त्यामुळे येथील पाण्याची लाईन, ग्रामस्थांनी खेळण्यासाठी उपलब्ध केलेले मैदान व रस्त्याच्या साईड पट्टीची पूर्णतः दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ आपले हद्द समाप्तीचे फलक लावण्याचे गरज आहे. तसेच, बेशिस्त वाहनांना गावात शिरण्याची बंदी होईल याची खबरदारी देखील प्रशासनाने घेतली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत .







