| पनवेल | वार्ताहर |
पनवेल एस टी डेपो ते खांदा कॉलनी असे रस्त्याने पायी जात असताना एका (65) महिलेच्या गळ्यातील 10 ग्राम वजनाची सोन्याची चैन जबरीने चोरून नेणार्या दोघा सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुवर्णा लांजेकर ( 65) रा. खांदा कॉलनी या पनवेल एस टी डेपो ते खांदा कॉलनी असे रस्त्याने पायी जात असताना आरोपी मोहित कोहली (23) व करण कोहली (22) या दोघांनी आपसात संगनमत करून त्यांच्या गळ्यातील जवळपास 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरी चोरी करून पळवून नेली होती. या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे व गुन्हे शाखेच्या पथकाने सदर दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले असून त्यांच्या अटकेमुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.