पोलिसांनी लावला पाच दिवसात तपास

| नेरळ | प्रतिनिधी |

रविवारी कर्जत ते नेरळ दरम्यान रिक्षा मधून प्रवास केला होता. या प्रवासात आंबिवली जवळील टेंभरे येथील महिला प्रवासी यांची काही रोख रक्कम आणि दागिने असलेली पर्स रिक्षामध्ये विसरल्या होत्या. त्या रिक्षा वाल्याचा शोध कर्जत पोलिसांनी पाच दिवसात लावला असून रिक्षा चालक हा एकसळ येथील रहिवाशी आहे.  

कर्जत पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (दि.18) चार फाटा ते नेरळ रोडवर असलेले मिस्टर वडेवाले हॉटेल ते साबणे डॉक्टर यांचे हॉस्पिटल असा प्रवास आंबिवली येथील महिला प्रवासी यांनी केला होता. सुमन शिवाजी निलदे या रिक्षाने प्रवास करत असताना त्यांची हॅन्ड बॅग आणि त्यात असलेले रोख रक्कम व सोन्याची चैन असे रिक्षामध्ये विसरल्या गेल्या होत्या. त्‍यांनी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल कली. त्‍यानंतर कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली यांची टीम तयार करण्यात आली.

यांनी घटनेबाबत तात्काळ दखल घेत संपूर्ण रोडवरील सीसीटीव्ही फुटेज चेक करून रिक्षा चालक चिंतामण तुकाराम बोराडे (48) रा. एक्सल चिंचवली ता. कर्जत याचा शोध घेऊन चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या रिक्षा वाल्याने आपल्याच रिक्षामध्ये विसरलेले पर्स पोलिसांच्या स्वाधीन केली. त्या पर्समध्ये काही रोख रक्कम आणि सोन्याची चैन असा ऐवज होता. कर्जत पोलीस ठाणे येथे महिला प्रवासी यांना बोलावून ती पर्स त्यांच्या ताब्यात देण्यात आली.

Exit mobile version