पोलिसाने वाचवले हॉटेल कर्मचाऱ्याचे प्राण

| पनवेल | वार्ताहर |

हॉटेल कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात येताच पोलिस अंमलदाराने त्याच्या हृदयाला पम्पिंग करून प्राण वाचवले आहेत. खारघर येथील हॉटेलमध्ये हा प्रसंग घडला. यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या मोटर वाहन विभागातील पोलीस अंमलदारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

खारघर येथील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. नवी मुंबई पोलीस दलात मोटर वाहन विभागात नियुक्तीवर असलेले पोलीस अंमलदार एकनाथ पाटील हे हॉटेलमध्ये सहकुटुंब जेवण करण्यासाठी गेले होते. ते हॉटेलमध्ये पोहोचले असता काही वेळातच त्यांना एक कर्मचारी उभा असताना जमिनीवर कोसळल्याचे दिसले. इतरांसोबतच पाटीलदेखील त्याठिकाणी धावले. परंतु, जमिनीवर पडलेली व्यक्ती निपचित असल्याने त्यांना मिरगी आलेली नसून हा हृदयविकाराचा झटका असल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. दरम्यान, त्यांनी प्रशिक्षण घेतले असल्याने व्यक्तीच्या हृदयावर जोर देऊन पम्पिंग करण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नाने श्वास मोकळा होऊन त्यांचे प्राण वाचले.

Exit mobile version