नाशिकचे राजकीय वातावरण तापले

। नाशिक । प्रतिनिधी ।

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (दि.20) मे रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्या नाशिकचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्या प्रमुख लढत होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, शरद पवार या दिग्गज नेत्यांच्या त्यांच्या उमेदवारांसाठी सभा होत असताना दुसरीकडे शांतीगिरी महाराज देखील मागे नाही. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी नेत्यांच्या सभेसाठी गर्दी जमविण्याचे नियोजन करत आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत रॅली काढली. आता नाशिकमधून कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version