निधीअभावी तलावाचे काम रखडले
| महाड | प्रतिनिधी |
महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर असलेल्या ऐतिहासिक तलावाच्या सुशोभिकरणाचे काम राज्य शासनाच्या “तलाव संवर्धन योजनेंतर्गत“ करण्यात येत आहे. मात्र, हे काम आता निधीअभावी रखडल्याचे दिसून येत आहे. सदरचे काम शासनाकडून मंजुर करण्यात आलेल्या निधी पैकी 87 लाख रुपंयाचा निधी उपलब्ध झालेला नसल्यामुळे काम बंद असल्याची माहिती महाड नगरपालिचे अभियंता प्रविण कदम आणि मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली.
महाड पोलादपुर तालुक्याचे आराध्य दैवत असलेले श्री वीरेश्वर महाराजांचे मंदिर सुमारे 350 वर्षा पुर्वीचे शिवकालीन मंदिर असून, या मंदिरा समोर असलेल्या तळ्याचे सौदर्यीकरण करण्याचे काम तीन वर्षा पुर्वी हाती घेण्यात आले. सुमारे पाच कोटी पेक्षा अधिक सुशोभिकरणाला खर्च येणार आहे. या कामा मध्ये तलावाच्या चारही बाजुच्या भिंती नव्याने उभारण्यांत येणार असून, सभोवताली बगीचा तयार करण्यांत येणार आहे, त्याच बरोबर पथमार्ग, विद्युत रोषणाई, तलावाच्या मध्यभागी असलेला खांब इत्यादी कामे करण्या करीता शासनाने तलाव संवर्धन योजने अंतर्गत दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे. यासाठी महाडचे आमदार तथा रोजगार हमी मंत्री भरतशेट गोगावले, आमदार प्रविण दरेकर, खा.सुनिल तटकरे यांचे विषेश सहकार्य लाभले.
श्री वीरेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून तलाव सुशोभिकरण कामा करीता 75 लाख रुपये शासना कडे जमा करण्यात आले आहेत. तलावाच्या कामा साठी राज्य शासनाने निधी मंजुर केल्यामुळे सदरचे काम शासनाच्या आदेशा वरुन महाड नगरपालिकेच्या मार्गदर्शना खाली करण्यांत येत आहे. तीन वर्षा पुर्वी सदरचे काम पुणे येथील कंपनीला देण्यांत आले. सदर काम हे दोन टप्प्यात होत असून पहिल्या टप्प्यातील काम अपूर्ण आहे. सदरचे काम वरील कंपनीने पूर्ण करण्यात असमर्थता दर्शविल्यानंतर अन्य ठेकेदारा कडून काम करुन घेतले जात आहे. तलावाच्या कामा संबधी श्री वीरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच दिपक वारंगे, उपसरपंच रमेश नातेकर, माजी संरपंच दिलीप पार्टे, विश्वस्थ संजय पवार, गणेश वडके यांनी तलावाच्या कामाच्या चौकशीची मागणी राज्य शासनाकडे केली असुन शासनाने तलाव सुशोभिकरणा करीता मंजुर झालेला उर्वरित निधी त्वरीत पालिका प्रसासना कडे जमा करावा अशी मागणी केली आहे.
श्री वीरेश्वर देवस्थान तलावाच्या सुशोभिकरणाच्या कामा करीता पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित असुन शासनाने 2.50 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. यांतील 87 लाख रुपयांचा निधी उपलब्द झाल्या नंतर काम पुन्हा सुरु करण्यांत येईल त्याच बरोबर संबधीत ठेकेदाराच्या कामा संबधी नागरिकांमध्ये नाराजी असुन काम पुर्ण करण्यास दिरंगाई झाली असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यांत येइल त्याच बरोबर कामाचे ऑडिट करण्यात येईल अशी माहिती महाड नगरपालिकेचे बांधकाम अभियंता प्रविण कदम आणि मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली.