। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, नवीन ईमारत बांधण्यात यावी, अशी मागणी तळा तालुका शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. तळा तालुक्यातील जनावरांच्या उपचारासाठी असलेला पशुवैद्यकीय दवाखाना अतिशय जीर्ण झाला असून, धोकादायक स्थितीत असल्याने ही ईमारत कधीही कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे या ठिकाणी काम करणारे शासकीय कर्मचारी आपला जीव मुठीत धरून काम करतात. अनेक आधुनिक अवजारे व यंत्र सामुग्री तसेच पशु तपासणी साहित्य यांची ठेवणूक कशी करावी असा प्रश्न येथील कर्मचार्यांना पडला आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्याची नवीन ईमारत बांधण्यात यावी अशी मागणी केली आहे.