| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जात धर्म न पाहता सर्वांना सोबत घेऊन शहराचा विकास करणार तो पण पारदर्शक, लोकाभिमुख असणार आहे. सुनील तटकरे परिवार व मला शहरातील जनतेने माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. नगराध्याक्षा पद जनसेवा करण्याची संधी आहे असे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांनी मुरूड जंजिरा नगरपरिषद कार्यालयातील सभागृहात झालेल्या पदग्रहण समारंभा प्रसंगी केले. यावेळी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, माजी आ.अनिकेत तटकरे, माजी नगराध्यक्ष – मंगेश दांडेकर, अमित नाईक, सुरेंद्र म्हात्रे, फैरोज घलटे, मनोज भगत, मुख्याधिकारी सचिन बच्छाव, वासंती उमरोटकर, विश्वास चव्हाण, पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, अजित कासार, रुपेश पाटील, आदेश दांडेकर, तमीम ढाकम, प्रांजली मकू, प्रीता चौलकर, प्रमिला माळी, श्रद्धा अपराध आदीसह शहरातील नागरिक व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







