महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची लाईव्ह सुनावणी होणार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात 27 सप्टेंबरपासून होणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणीही लाईव्ह होणार असल्याने राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

सुरुवातीला हे लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबवर होणार आहे आणि नंतर सर्वोच्च न्यायालय लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी स्वतःचा प्लॅटफॉर्म विकसित करणार आहे. घटनापीठासमोरील या खटल्यांच्या लाईव्ह सुनावणीचा निर्णय सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फूल कोर्ट मीटिंगमध्ये घेण्यात आला. माजी सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या निवृत्तीवेळी लाईव्ह स्ट्रिमिंग केलं होतं. त्यावेळी ते नॅशनल इन्फॉर्मेटिंक्स सेंटर या सरकारी संस्थेच्या संकेतस्थळावर दाखवण्यात आलं होतं.

पाच हजार प्रकरणे निकाली
सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर न्यायालयातील पेंडीग प्रकरणं निकाली काढण्याचा सपाटा लावला आहे. त्यांनी अवघ्या 13 दिवसांत पाच हजारांच्यावर प्रकरणं निकाली काढली आहेत. यामध्ये 283 नियमित, 1212 हस्तांतरण केलेल्या तर 3618 अन्य प्रकरणांचा समावेश आहे. ही प्रकरणं निकाली काढण्यासाठी नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे.

Exit mobile version