ज्या सत्तेची भीती वाटते ती उलथवलीच पाहिजे; उद्धव ठाकरे

| मुंबई | वृत्तसंस्था |

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. ज्या सत्तेची भीती वाटते अशी सत्ता काहीच कामाची नसते. ती सत्ता उलथवूनच टाकली पाहिजे. त्यासाठीच मी उभा आहे. मला फक्त तुमची साथ हवी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.जळगाव जिल्ह्यातील काही भाजपा आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी मातोश्रीवर एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रयत्नाने हा पक्षप्रवेश झाला. पाचोरा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, सभापती, माजी सरपंच यांनी मातोश्रीवर येऊन ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी या सर्वांशी संवाद साधत त्यांना शिवबंधन बांधले. वैशाली पाटील आणि शिंदे गटात असलेले त्यांचे भाऊ, स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्यात मागील काही दिवसांपासून मोठा राजकीय वाद पाहिला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

सर्वजण मातोश्रीत आला आहात. मी तुमचे स्वागत करतो. तुम्ही आता शिवसेनेत काम करणार आहात. पण एक लक्षात घ्या. सत्तेला घाबरु नका असा सल्ला त्यांनी दिला. 1 जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होईल. नव वर्षासहीत पुढील सर्व वर्ष लोकशाहीची जाओ हीच सदिच्छा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Exit mobile version