राष्ट्रपतींनी घेतला बॅटमिंटनचा आनंद

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताची फुलराणी सायना नेहवालसोबत बॅटमिंटन खेळण्याचा आनंद लुटला. राष्ट्रपती भवन इथल्या बॅटमिंटन कोर्टवर या दोघांमध्ये सामना पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या खेळातील कौशल्याची चुनूकही दाखवली. राष्ट्रपतींचा हा बॅटमिंटन खेळतानाचा व्हिडिओ खुद्द राष्ट्रपती भवनकडून शेअर करण्यात आला आहे. 23 सेकंदाच्या या व्हिडिओत मुर्मू या नेहवाल यांच्यासोबत बॅटमिंटन खेळताना दिसत आहेत. यावेळी कार्यालयातील अधिकारी वर्ग आणि काही लहान खेळाडूदेखील कोर्टवर हा सामना पाहण्यासाठी उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, राष्ट्रपतींनी पास केलेल्या बॅटमिंटनच्या फूल परत टोलवताना साईनालादेखील कष्ट घ्यावे लागल्याचे दिसून आले. उलट दोन वेळेस तिला आपले पॉईंट गमवावे लागले. यामुळे राष्ट्रपती मुर्मू यांचे उपस्थितीतांनी टाळ्या वाजवून कौतुकही केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले.

Exit mobile version