गॅस सिलिंडरचे दर ९१ रुपयांनी घटले

हॉटेल व्यावसायिकांना मिळाला दिलासा
। मुंबई । वृत्तसंस्था ।

व्यावसायिक गॅस सिलेंडर्सच्या दरात ९१.५० रुपयांनी घट झाली आहे. राष्ट्रीय तेल मार्केटिंग कंपन्यांनी ही दर कपात केली असून यामुळं देशातील हॉटेल व्यावसायिकांना एक दिलासा मिळाला आहे. आजपासूनच अर्थात १ फेब्रुवारीपासून हा नवा दर लागू होणार आहे.
राष्ट्रीय तेल मार्केटिंग कंपन्यांनी दर कपात केल्यानंतर व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडर्सचा दिल्लीतील नवा दर १९०७ रुपये इतका असणार आहे.

Exit mobile version